अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । साने गुरुजींची १२५ जयंती १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून अमळनेर येथील पु.साने गुरुजी यांच्या पुतळ्यासमोर साजरा केली.
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्यावतीने सदर उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते यांनी ” आपापल्या आयुष्यात साने गुरुजीची विचारमुल्य रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला. तर “साने गुरुजी अमर रहे!”च्या घोषणा देत साने गुरुजींचा जयघोष केला.
सदर उपक्रमासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानसह, सानेगुरुजी शैक्षणिक विचार मंच,साने गुरुजी विद्यालय, राजमुद्रा फाउंडेशन, सानेगुरुजी वाचनालय व ग्रंथालय, दि अमळनेर अर्बन बँक, मसल फॅक्टरी जिम व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिक्षक शिक्षिका वृंद उपस्थित होते.