पारोळ्यात श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी पारोळा शहरात विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ८ वाजता हत्ती गल्ली येथील जुन्या तेली भावनात श्री संताजी जगनाडे महाराज यांचा तेली समाज बांधव यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजन करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणापासून ते आझाद चौक, झपाट भवानी चौक, राम मंदिर चौक, बाजारपेठ, कजगाव चौफुली, महादेव मंदिर चौक, आझाद चौक वरून थेट नव्या तेली भावना पर्यंत शेकडो जनांच्या उपस्थितीत मोटरसायकल रॅली काढून संताजींचा जयघोष करण्यात आला. दहा वाजेच्या सुमारास एरंडोल पारोळा मतदार संघाचे आमदार अमोल पाटील यांनी आझाद चौक येथे श्री संताजी जगनाडे महाराज  यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपासून जुन्या तेली भवन येथून श्री संताजी जगनाडे महाराज मूर्तीची डीजे व बँडच्या तालात शोभायात्रा काढण्यात आली.

पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या हस्ते यावेळी पूजन करण्यात आले, ही शोभायात्रा आझाद चौक येथे पोहोचल्यानंतर श्री संताजी जगनाडे महाराजांचे पुतळ्याचे माजी आमदार चिमणराव पाटील, डॉ दिनकर पाटील, मधुकर पाटील यांच्या हस्ते पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर शोभायात्रा ही झपाट भवानी चौक, कसाई मशीद,राममंदिर चौक, न्हावी गल्ली, कासार गणपती चौक वरून थेट जुन्या तेली भवन येथे रात्री दहा वाजता शांततापूर्ण उत्साहात व पोलीस बंदोबस्त समारोप करण्यात आला.

दरम्यान या शोभायात्रेत आमदार अमोल पाटील माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी देखील सहभाग घेऊन तरुणांचा उत्साह वाढविला यावेळी तेली समाजाचे अध्यक्ष कैलास आनंदा चौधरी, उपाध्यक्ष दिलीप चौधरी, सतिश चौधरी, मनोज चौधरी पंच विश्वास चौधरी, गोकुळ चौधरी, साहेबराव चौधरी, किशोर चौधरी, दिलीप चौधरी,प्रल्हाद चौधरी, धर्मदास चौधरी, संजय चौधरी, दिलीप चौधरी, किशोर चौधरी, रवींद्र चौधरी, अनिल चौधरी, भास्कर चौधरी, नगरसेवक भैय्या चौधरी, कपिल चौधरी, भैय्या सुदाम चौधरी, किरण चौधरी, सुरेश चौधरी, समाजसेवक साहेबराव ठाकरे व उपनगराध्यक्ष सुदाम चौधरी शिवसेनेचे शहर प्रमुख अमृत चौधरी भा.ज.पा. शहरप्रमुख मुकुंदा चौधरी सामाजिक कार्यकर्ते भागवत चौधरी योगेश चौधरी विपुल चौधरी उत्सव समितीचे अध्यक्ष उमेश भाऊ चौधरी तैलिक महासभा तालुकाध्यक्ष भागवत चौधरी अध्यक्ष नवयुवक मंडळाचे अध्यक्ष खुशाल चौधरी सह पंचमंडळ नवयुवक मंडळ समाज बांधव व महिला या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content