शिरसोलीत संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संत नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्था, शिरसोली यांच्या वतीने संत नरहरी महाराज यांच्या ७३९ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल रामचंद्र सोनार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमात विठ्ठल सोनार गुरुजी यांनी संत नरहरी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर समाजबांधवांनी प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवान सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर, सचिव अतुल भालेराव यांच्यासह कैलास सोनार, विलास सोनार, संजय सोनवणे, दीपक सोनार, संजय वाघ, अनिल सोनार, मुकुंदा विसपुते, गजानन दुसाने, समाधान सोनार, सचिन दुसाने, राजेंद्र गजानन सोनार, धनराज रणधीर, भुषण रणधीर, चेतन सोनार, प्रशांत सोनार, भरत सोनार, राजू सोनार आदी उपस्थित होते.

Protected Content