महान फिरकी गोलंदाज माजी कर्णधार बिशनसिंह बेदी कालवश

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान फिरकी गोलंदाज बिशनसिंह बेदी  यांचे ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. १९ ६६ ते १९७९ पर्यंत त्यांनी भारतीय संघासाठी कसोटी सामने खेळले आहेत. २२ कसोटी सामन्यात त्यांनी इंडीया टीमचे नेतृत्व केले आहे.

बिशन सिंह बेदी १९७० च्या शतकात स्पिन गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी २२ टेस्ट सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून जबाबदार सांभाळली होती. बिशन सिंह बेदी याची भारतीय टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पिनर्समध्ये गणना केली जायची. त्यांनी टीम इंडियासाठी ७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्यांनी २७३बळी घेतले होते.

बिशन सिंह बेदी यांनी पंजाब संघाकडून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. बिशन सिंह बेदी १९६८ मध्ये दिल्ली रणजी संघात सामील झाले. त्यानंतर ते अनेक वर्षे दिल्ली रणजी संघाचा भाग होते. बिशन सिंह बेदी यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बिशन सिंह बेदी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द एका दशकाहून मोठी होती. त्यांनी सुमारे १२ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले होते.

Protected Content