जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या जळगाव शहरातील जुने जळगावात शनिवारी ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता श्री खंडेराव महाराज यांच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. श्री खंडेराव महाराज की जयच्या जयघोषाने बारागाड्यांना सुरूवात करण्यात आली.
जळगाव शहरातील जुने जळगावात सुमारे १५० वर्षांपासूनची परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज यांच्या उत्सवाच्या निमित्ताने आज बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भगत रमेश नारायण धनगर यांना बारागाड्या ओढण्याचा मान मिळाला. यावेळी जुने जळगावाचे पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांनी विधीवत पुजा करण्यात येवून बारागाड्यांना सुरूवात करण्यात आली. यावेळी जुने जळगावातील तरूण कुढापा मित्र मंडळ, जुने जळगाव बहुउद्देशीय मित्र मंडळाचे अनमोल सहकार्य लाभले आहे. या बारागाड्या तरूण कुढापा मित्र मंडळ चौक ते जुने जळगाव बहुउद्देशीय मित्र मंडळ चौकपर्यंत या बारागाड्या काढण्यात आल्या. या कार्यक्रमात शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने गर्दी पहायला मिळाली. यावेळी खंडेराव महाराज की जयच्या जयघोषाने बारागाड्या उत्साहात काढण्यात आले.