दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांचा भाजपमध्ये प्रवेश; आपशी युती केल्यामुळे होते नाराज

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी ४ मे रोजी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आम आदमी पक्षाशी युती केल्यामुळे त्यांनी २८ एप्रिल रोजी दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज ४ मे रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत नीरज बसोया, राजकुमार चौहान, नसीब सिंग आणि अमित मलिक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते. या आधीही २०१७ मध्ये लवल १० महिन्यासाठी भाजपमध्ये गेले होते. परंतू ते परत काँग्रेसमध्ये आले होते. यावेळी लवली म्हणाले, आम्हाला भाजपच्या बॅनरखाली आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जनतेसाठी लढण्याची संधी देण्यात आली आहे. मला पूर्ण आशा आहे की, देशात भाजपचे सरकार स्थापन होईल. आगामी काळात भाजपचा झेंडा दिल्लीतही फडकणार आहे.

Protected Content