मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील जी. जी .खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर दत्तक गाव घोडसगाव येथे २५ ते ३१ डिसेंबर या कालावधी दरम्यान सुरू असून या शिबिरात आज २६ डिसेंबर रेाजी द्धिक सत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना निलेश मेढे यांनी ‘पत्रकारिता काळाची गरज’ या विषयावर उदाहरणादाखल प्रकाश टाकला. तसेच आधुनिकतेच्या काळामध्ये प्रजातंत्राचा चौथा स्तंभ पत्रकारिता आज घडीला जिवंत ठेवण्यासाठी तरुणांनी पत्रकारीतेकडे वळावे असे आवाहन केले. त्यासाठी सर्वांनी लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. असे आवर्जून सांगितले.
पत्रकारितेचा प्रारंभ ते आजपर्यंतची पत्रकारिता या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच अनेक राजकारणी लेखक कवी साहित्यिक हे प्रिंट मीडियातून पुढे गेलेले आहेत पत्रकारितेत काम करीत असताना पत्रकारांनी निःपक्षपाती पणे निर्भीड काम वास्तविक घटनांबद्दल लेखन तसेच माहितीपूर्ण बातम्या व घटना तथ्य कल्पना यांचा अहवाल तयार करून बातमी दिली पाहिजे पत्रकार हा त्याच्या लेखणीतून जनतेचा आवाज मांडणारा असावा व त्याची लेखणी ही सत्य व न्यायासाठी असावी तसेच वृत्तपत्र वाचनाने ज्ञानात भर पडते म्हणून वृत्तपत्र वाचले पाहिजे असा विद्यार्थ्यांना सल्ला देखील दिला.
तसेच दुसरे प्रमुख वक्ते शरद बोदडे यांनी ‘महापुरुषांची पत्रकारिता’ या विषयावर मार्गदर्शन केले. राजाराम मोहन राय, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळक अशा महापुरुषांच्या पत्रकारितेविषयी अनेक उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना महापुरुषांची थोर गाथा आपल्या व्याख्यानातून प्रस्तुत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित शोषित यांच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी मूकनायक बहिष्कृत भारत प्रबुद्ध भारत अशी पाक्षीके सुरू केली.
महापुरुषांनी सदैव आपल्या लेखणीतून समाज हितच जोपासणे व सदैव समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले असे त्यांनी आवर्जून नमूद केले. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन डॉ. कृष्णा गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.दीपक बावस्कर यांनी केले. तर सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सी. व्ही. ठीगळे यांनी केले. या शिबिरासाठी 120 विद्यार्थी सहभागी आहेत.