Home धर्म-समाज प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर रावेरात भव्य शेाभायात्रा

प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर रावेरात भव्य शेाभायात्रा


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अयोध्या येथे उद्या भगवान श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्याने आज रावेर शहरात भगवान श्रीराम यांची मूर्ती भव्य शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी रस्तावर रांगोळी काढत फटाके फोडत जल्लोषामध्ये शोभायात्रा काढण्यात आली यावेळी रामभक्तां कडून मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा घेऊन श्रीराम यांच्या गाण्यावर नाचत जल्लोष केला यावेळी मोठ्या संख्येने रामभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन भाजपा, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रावेर लोकसभा निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन, जिल्हा चिटणीस श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपा तालुकाध्यक्ष महेश चौधरी, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, प्रहार जनशक्ती अनिल चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने रामभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound