भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक (व्हिडीओ)

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील जुने जळगावातील प्रभू श्रीराममंदीर येथून भगवान परशूराम जयंतीनिमित्ताने भव्य  मिरवणूक काढण्यात आली.

 

जळगाव शहरासह जिल्ह्यात तब्बल दोन वर्षांनंतर भगवान परशूराम जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. शहरातील बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हा जन्मोत्सव साजरा करण्यात आले. मंगळवार ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रा  काढण्यात आली.

 

बहुभाषिक ब्राह्मण संघाततर्फे भगवान परशुराम जन्मोत्सव व ब्राह्मण एकता दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सायंकाळी ५ वाजता जुने जळगावातील श्रीराम मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत लेझीम पथक, तलवार बाजी, दांडपट्टा, यांचे चित्त थरारक प्रात्यक्षिके तसेच महिलांचे ढोल पथक यांचेही सादरीकरण करण्यात आले. भगवान परशुरामांची भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेतली. मिरवणुकीत बहु भाषिक ब्राम्हण समाजातील सर्व मंडळातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!