चोपडा प्रतिनिधी । श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाजाच्या संस्थेतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्यदिव्य सत्कार समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष के.डी.चौधरी होते. गुणवंतांचा सत्कार हभप अध्यात्मिक रत्न तथा वारकरी रत्न अशोक दासजी महाराज तसेच राजाराम बाबुराव पाटील, हभप बापु महाराज यांचे हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सोबत बक्षीस देण्यात आले. उच्च शिक्षण प्राप्त विद्यार्थ्यांचा शाल व हार देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा ही यावेळी गौरव करण्यात आला. सुरुवातीला संस्थेचे उपाध्यक्ष टी.एम. चौधरी यांनी विद्यार्थ्यांचा व त्यांचा आई-वडिलांचा गौरव करून शिक्षण हेच प्रगतीचे माध्यम असल्याचे नमूद केले. विद्वान माणसाला सर्वोच्च मानाचे स्थान असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाल्याने हा समाजातर्फे असल्याचे नमूद केले.
भविष्यात समाजाच्या कार्यात आणि देशाच्या कार्यात आपले योगदान महत्वाचे ठरेल असाही मोलाचा सल्ला दिला. उपस्थितांचे स्वागत टीएम चौधरीसर यांनी केले. यावेळी इयत्ता बारावी मध्ये विशेष प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हेमंत चौधरी, मयुरी चौधरी, तृप्ती चौधरी, साक्षी चौधरी, इयत्ता दहावी विशेष संपादन केलेले विद्यार्थी कोमल चौधरी, गितेश चौधरी, भूषण चौधरी, पदवीप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये तेजस्वी चौधरी, धनश्री चौधरी, नयना चौधरी, भाग्यश्री चौधरी, जयश्री चौधरी, शिष्यवृत्ती ती प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये वेदांत चौधरी, निशांत चौधरी, श्रीकांत चौधरी, उदय चौधरी, पियुष चौधरी, ऋतिका चौधरी या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात यश प्राप्त केल्याने त्यांच्या व त्यांच्या आई-वडिलांचा बक्षीस देऊन सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
महेंद्र चौधरी यांनी आभार मानले. झालेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना व त्यांच्या आई-वडिलांना खूपच आनंद झाला. अनेकांनी या कार्यक्रमाचे अभिनंदन केले. यावेळी रांगोळी स्पर्धेतील स्पर्धकांना व परीक्षकांना बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव प्रशांत चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवकांत चौधरी, महेंद्र चौधरी, गोपीचंद चौधरी, गुलाब चौधरी, नारायण चौधरी, शशिकांत चौधरी, नम्रता चौधरी, योगिता चौधरी ,छोटू चौधरी, प्रिया चौधरी, धनश्री चौधरी, सरला चौधरी, सूर्यकांत चौधरी आदींनी खूप परिश्रम घेतले. सदरचा कार्यक्रम तेली समाज मंगल कार्यालय संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे नुकताच संपन्न झाला.