Home Cities पारोळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पारोळ्यात भव्य रक्तदान शिबिर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पारोळ्यात भव्य रक्तदान शिबिर

0
79

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पारोळा मंडळाच्या वतीने गुरुवारी राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडलेल्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरासाठी माधवराव गोळवलकर ब्लड बँक, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदानासोबतच समाजात आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विविध वयोगटातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

याच निमित्ताने बोहरा सेंट्रल स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. तज्ज्ञ दंतचिकित्सकांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून दातांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच योग्य दंतस्वच्छता, संतुलित आहार आणि नियमित तपासणीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, सुरेंद्र बोहरा, गोविंदा आबा शिरोळे, रोहन मोरे, पराग मोरे, तालुकाध्यक्ष अतुल पवार, बहादरपूर मंडळाध्यक्ष समाधान पाटील, सरचिटणीस विनोद पाटील, सरचिटणीस गणेश पाटील, मुकुंदा चौधरी, रवींद्र पाटील, धीरज महाजन, नगरसेवक अमोल शिरोळे, ॲड. कृतिका आफरे, रेखाताई चौधरी, ॲड. भूषण पाटील, नगरसेवक छोटू पाटील, सोमनाथ देशमुख, गोकुल पाटील, प्राचार्य व्ही. आर. पाटील, अनिल टोळकर, लक्ष्मीकांत भावसार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आणि आरोग्य जनजागृती यांचा संगम घडवून आणणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले. समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे वाढदिवसाचे औचित्य सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून साजरे करण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound