पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा प्रचार केला नाही. अजित पवार यांच्या पक्षाकडून युतीचा धर्म पाळण्यात नाही, मग आपण घड्याळाचा प्रचार का करायचा?असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे. पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करायचा नाही, असा ठराव भाजपने केला आहे.
आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे, भाजप नेते सदाशिव खाडे, भाजप प्रवक्ते राजू दुर्गे यांनी पक्षाच्या बैठकीत हा ठराव समंत केला आहे. या सर्वांचा आमदार अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. लोकसभा निवडणुकीत कमळाचा उमेदवार मिळाला नाही, आता आम्हाला कमळाचाच उमेदवार हवा आहे, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
यामुळे आता महायुतील पिंपरी मतदारसंघावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर उमटला. तर ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे केली जाणार आहे.