बोदवड प्रतिनिधी । शहरातील व्यापाऱ्याच्या धान्याचे दुकानातून १ लाख १४ हजार रूपये किंमतीची तुरदाळ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अनिल गुलाबचंद अग्रवाल (वय-६५) रा. राममंदीराजवळ बोदवड हे कडधान्याचे व्यापारी आहेत. त्योच जामनेर रोडवरील हायस्कुलजवळ गुलाबचंद अग्रवाल नावाचे धान्याचे दुकान आहे. २६ मे सकाळी ११ ते २७ मे सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कडीकोयंडा तोडून ६० किलो वजनाचे तुरीच्या दाळचे ३२ कट्टे असा एकुण १ लाख १४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी बोदवड पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड करीत आहे.