पाचोरा प्रतिनिधी । शहरातील गो. से. हायस्कूल येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शालेय स्तरावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या विषयावर विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले. व सावित्रीच्या वेशामध्ये विविध विद्यार्थिनींनी भाग घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, शाळेचे पर्यवेक्षक नरेंद्र पाटील, आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, उपप्रमुख आर. बी. बोरसे ज्येष्ठ शिक्षिका अंजली गोहील, छाया सूर्यवंशी, महेश कौण्डिन्य, सदस्य अरुण कुमावत संगीत शिक्षक थोरात हे उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देविदास थोरात उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांच्यावर आपले मनोगत व्यक्त केले. शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धापरीक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वैशाली कुमावत, ज्योती पाटील, गायत्री पाटील, अंजली गोहिल यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बोरसे, आभार प्रदर्शन रवींद्र जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम हा सोशल डिस्टंसिंग ठेवून पूर्णपणे सुरक्षित होईल याची आज लोकांनी संपूर्ण काळजी घेतली होती विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य उत्सव पाहून सर्वच भारावले.