युवकांच्या स्वप्नांना योग्य प्रारंभ देण्यासाठी भारत सरकार नेहमी तयार – माजी खा. पूनम महाजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालय येथे भारत महासत्ता निर्मितीत आपला सहभाग युवक संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी खासदार पूनम ताई महाजन या उपस्थित होत्या तर मंचावर गोदावरी फाउंडेशनचे सर्वेसर्वा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील उपस्थित होते.


यावेळी पुनम ताई महाजन यांनी मार्गदर्शन करताना. २०४७ ला भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी आहे. १९४७ ला स्वातंत्र्यासाठी अनेकांनी फटके खाल्ले आणि अनेक जण हुतात्माही झाले. भारताच्या स्वातंत्र्याच्या शतकाला २३ वर्ष बाकी आहेत. भारताला जागतिक महासत्ता झालेले बघायचे असेल तर तरुणांनी आपली स्वप्ने भारताशी जोडले पाहिजे. भारत महासत्ता झाल्यानंतर संधी उपलब्ध होणारच आहे. भारत स्वतंत्र होण्यासाठी जे झटले त्याचे फळ २०४७ च्या रूपात आपल्याला बघायला मिळणार आहे. २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताना हे सरकार युवक आणि महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले होते. तुम्ही ध्येय ठरवले तर मार्ग नक्कीच दिसतात.युवकांच्या स्वप्नांना योग्य प्रारंभ देण्यासाठी भारत सरकार नेहमी तयार आहे. काळानुरूप बदल स्वीकारले पाहिजे. खाली हात आहे ते लेकिन खाली हात नाही जायेंगे, कुछ करके जायेंगे. तुमचे स्वप्न आयुष्याचा ठरलेला गोल आहे. मी आणि आपण मिळून भारताला महासत्ता बनवू यासाठी स्वप्न देशाच्या स्वप्नाशी जोडा.

मुली प्रेमळ असतात पण आव्हान दिले तर मग त्या पुरून उरतात. परमेश्वराने एक आयुष्य दिले चुका होतील त्या दुरुस्ती करता येतात. २०१४ ला मी ज्या मतदारसंघात लढले तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आपण स्वीकारले आणि निवडणूक जिंकले. वेड लागले की इतिहास घडतो, हुशार लोक तुमचा इतिहास वाचत असतात. स्टोरी प्रत्येक जण येत असतो पण शेवट कसा करायचा ते आपल्या हाती असते. १९४७ ला इंग्रजांच्या विरोधात लढलो, नंतर आणीबाणीचा काळ ही पाहिला. २००१ ला भारताने महासत्ता कडे जाण्याचा पहिला पाया रचला. पोखरणचे चाचणी झाली. जगात भारत आणि चीन हे दोनच देश असे आहेत जे महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहेत. दोघांमध्ये एक फरक आहे.भारतात लोकशाही आहे तर चीनमध्ये लोकशाही नाही. आपले संस्कृती आणि विश्वासार्हता अधिक आहे. त्यामुळे जगातील अन्य देशांना भारताबद्दल विश्वास आहे. युक्रेन आणि रशिया च्या संघर्षामध्ये भारत मध्यस्थी करेल असे कोणालाही वाटले नव्हते. २०१४ नंतर हे घडायला सुरुवात झाली. कोविड मध्ये भारत निर्मित लस जगात सर्वोत्तम ठरल्या. आपण सर्व मिळून भारताला पुढे नेऊ असे सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे पूनम ताई महाजन यांनी दिली. समारोपीय भाषण माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी केले तर प्रस्ताविक वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत साळुंके यांनी केले.

Protected Content