नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवजड उद्योग मंत्रालयाने देशात ई-व्हेईकलला चालना देण्यासाठी नवीन योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार, प्रति दुचाकी वाहनासाठी 10,000 रुपयांची मदत देण्यात येईल.
अवजड खात्याचे मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी ई-वाहन योजना घोषीत केली. मोदी सरकार ई-वाहन योजनेसाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एप्रिल 2024 ते जुलै 2024 या चार महिन्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्याआधारे जवळपास 3.3 लाख दुचाकी वाहनांना मदत पोहचविण्यात येणार आहे. तर ई-कार्ट, ई-रिक्षा या तीन चाकी वाहनांसाठी 25,000 रुपयांपर्यंत मदत देण्यात येईल.
41,000 वाहनांपेक्षा अधिक वाहनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मोठे तीनचाकी वाहन खरेदीवर 50,000 रुपयांची मदत देण्यात येईल. ही योजना इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकीसाठी आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढविण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. फेम-2 अंतर्गत 31 मार्च, 2024 पर्यंत अथवा मदत निधी येईपर्यंत विक्री करण्यात येणाऱ्या ई-वाहनांना ही मदत देण्यात येईल.