यावल प्रतिनिधी – तालुक्यात झालेल्या अति पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन , याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोना संसर्गाच्या गोंधळामुळे आदीच डबघाईला व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना गेल्या काही दिवसापुर्वी झालेल्या पावसाच्या असमानी संकटाने अधिकच संकटात आणले ते यंदाच्या खरीप हंगामाचे हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली असुन, शासना तात्काळ या पिंकाचे पंचनामे करून आपल्या अन्नदाता शेतकऱ्यास आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल तालुका सचिव संजयन नन्नवरे ,यावल शहर अध्यक्ष चेतन अढळकर, रस्ते आस्थापना विभागाचे तालुकाप्रमुख बळीराम पाटील , रस्ते आस्थापनाचे तालुका उपाध्यक्ष निलेश खैरनार , आबीद कच्छी , विरेन्द्र राजपुत , विशाल पाटील, अमोल सोनवणे , सचिन बारी , किशोर नन्नवरे , किशोर इंगळे यांच्या स्वाक्षरी आहेत .