मुंबई वृत्तसंस्था | कोरोना रुग्णाचं प्रमाण कमी होत असल्यामुळं राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले होते आता त्याच पार्श्वभूमीवर दि.१ फेब्रुवारीपासून दिशा निर्देशाचं पालन करत राज्यातील महाविद्यालयेही सुरू परवानगी देण्यात आली आहे.
राज्यातील शाळेसोबतच, महाविद्यालयेदेखील सुरू करण्यात यावी अशी मागणी होत असल्याने आणि राज्यातील कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालयेही सुरू होणार असल्याचे यासंदर्भात शासन आदेशही राज्य सरकारनं जारी केले आहेत.कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहतां येणार आहे. लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांचं ऑनलाइन पद्धतीनंच शिक्षण सुरु राहील दरम्यान दि. १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा या ऑनलाइन पद्धतीनंच घेण्यात येणार असून त्यानंतर घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीनं घेण्याबाबत विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असंही सरकारनं सांगितलं आहे.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, समूह विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग दिनांक मंगळवार, दि. १ फेब्रुवारी २०२२ पासून प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहेत. मात्र महाविद्यालये सुरू करावी अथवा नाही आणि त्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेता येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.