शेतकऱ्यांचे पाणी संदर्भातील प्रश्न लवकरच सोडविसाठी शासन कटिबध्द ! : केंद्रीय मंत्री सी.आर.पाटील


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांचे आज, रविवार ९ मार्च रोजी सकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या आगमनाच्या वेळी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव येथील विविध सामाजिक, शेतकरी आणि जलस्रोतांच्या संदर्भात महत्त्वाच्या घोषणांची माहिती देण्यात आली.

मुक्ताईनगर तालुक्यात जल संचय आणि जनभागीदारी यासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांची अंमलबजावणी सुरू असून, येथील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्यांना त्वरित समाधान मिळवून देण्यासाठी शासनाने काही पाझर तलावांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी निधी मंजूर केला आहे. या कामाच्या शुभारंभाचा समारंभ केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

जल अभियानाच्या या उपक्रमात पाणी साठवणूक, जलसंचय आणि जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी कामे करण्यात येणार आहेत. तसेच, जल मिशनच्या अंतर्गत येथील पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली जात आहेत. केंद्रीय मंत्री श्री. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “जळगाव जिल्ह्यासह मुक्ताईनगर आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रांतील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्यांना त्वरित व प्रभावी उपायोजना करण्यात येईल. येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीचा प्रकल्प जल अभियानाच्या माध्यमातून लवकरच सुरू होईल. यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा नियमित होईल आणि त्यांची पाण्याची समस्या कमी होईल.” यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.