आता शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण !

0
33


मुंबई प्रतिनिधी । भाजपने नकार दिल्यानंतर आता दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण दिले आहे.

भाजपने आज सायंकाळीच आपण सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केेले होते. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण दिले. उद्या अर्थात सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत याबाबत निर्णय घेण्याचा वेळदेखील शिवसेनेला देण्यात आला आहे.