जळगाव प्रतिनिधी । समाजात पोलिसांबाबत अतिशय नकारात्मक प्रतिमा असतांना रस्त्यावरील खड्डे बुजण्यासाठी वाहतूक पोलिस स्वत: प्रयत्न करत असल्याचे सुखद चित्र आज जगासमोर आले आहे. जनसंग्रामचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते विवेक ठाकरे यांनी हा प्रकार जगासमोर मांडला आहे.
जनसंग्रामचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी आज फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यात म्हटले आहे की-
आज १६ ऑक्टोबर रोजी पुण्याहून मुंबई जातांना आम्ही सिंहगड रोडवर थांबलेल्या हॉटेल विश्वास मधून बाहेर पडतांना पोलिसातील माणुसकी व सहृदयता जिवंत असल्याचे पाहिले.थबकलो आणि पुन्हा खात्री केली की खरंच पोलिसचं आहे ना…?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार सर्व महाराष्ट्रात कोसळत असलेल्या प्रचंड पावसाने सर्वत्र बेहाल परिस्थिती झाली आहे. पुण्यातील रस्त्यांवर सुद्धा सखल भागात पाणी साचल्याने सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत.रस्त्यांच्या या खड्डयांनी दोन दिवसांत पुणेकर प्रचंड त्रस्त आहेत.या विदारक परिस्थितीची जाणीव झाल्याने शहरातून जाणार्या पुणे-बंगलोर रोडवरील वडगाव ब्रिजजवळ वाहतूक पोलिसाने आपल्यातील माणुसकीचे दर्शन दिले. समाजाच्या दोस्त या पोलिसाने खूप मोठी जबाबदारी उचलत खड्डे बुजवण्याचे काम चालवले आहे. महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीची वाट न पाहता वाहनधारकांस हानी पोहचू नये म्हणून रस्त्यातील खड्ड्याची माहिती देता देता या भल्या माणसाने अक्षरशः मुरुमाच्या पाट्या आपल्या खांद्यावर उचलून थेट खड्डे बुजवायला घेतले आहे.
पोलिसांप्रती जिकडे-तिकडे प्रचंड नकारात्मकता दिसत असतांना सकारात्मक संदेश देणारा आमचा हा व्हिडिओ पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत जरूर पोहचला पाहिजे म्हणजे या समाजाच्या दोस्त पोलीस माणसाला त्याच्या सहृद्यतेचे नक्की बक्षिस मिळेल असे वाटते असे विवेक ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
खाली पहा मुरूमाने रस्ते बुजणारा पोलीस !
https://www.facebook.com/vivek.thakare.376/videos/2105967366213907