पिंप्राळ्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्या

जळगाव प्रतिनिधी । मागील भांडणाचा वचपा काढण्याच्या कारणावरुन एकाला तीन ते चार जणांनी तलवार, कोयत्याने वारून प्राणघात हल्ला केल्याची घटना १३ रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील एकाला रामानंद नगर पोलीसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, उषाबाई दिलीप नगराळे वय 40 या बुध्द वसाहत पिंप्राळा हुडको येथे पती, दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेजारी त्यांचा लहान भाऊ सुनील पंडीत भालेराव रा. पिंप्राळा हुडको तसेच आई नर्मदा व बहिण अशा हे तिघेही राहतात.13 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास सुनील पंडीत भालेराव यास मागील भांडणाचा वचपा काढण्यासाठी मिलिंद भिमराव आखाडे वय 30 रा. पिंप्राळा हुडको , पंकज आडागे, पंकज उर्फ पंक्या रिक्षावाला, विरन खैरनार या चौघांनी या परिसराती मंदिरासमोर कोयते व तलवारीने बेदम मारहाण केली. याबाबत सुनील भालेराव यांची बहिण उषाबाई यांना गल्लीतील भिमा सोनवणे व योगेश या दोघांनी सुनील यास मारहाण झाल्याची माहिती दिली. त्यानुसार उषाबाई यांनी घटनास्थळ गाठले असता, सुनील हा खाली पडलेला होता, त्यच्या डोक्या, छातीवर, डावे हाताच्या कोपर्‍यावर मगटावर व उजव्या मांडीवर जबर दुखापत झाली असल्याचे दिसून आले. यानंतर उपाषाबाई यांनी घराजवळील रिक्षावाला याच्या रिक्षातून जखमी सुनील यास देवकर आर्युवेद महाविद्यालयात उपचारासाठी हलविले. याठिकाणाहून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याप्रकरणी  रामानंदनगर पोलीस ठाण्यात मिलिंग आखाडे, पंकज आडागे, पंकज उर्फ पंक्या रिक्षावाला, विरन खैरनार या चौघाविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

यांनी केली कारवाई

गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी भेट देत पाहणी केली होती. तसेच संशयितांना अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. गुन्हे शोध पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण यास संशयितांबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार रामानंदनगर पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुहास राऊत, विनोद सोनवणे, विजय खैरे, उमेश पवार, रवी पाटील, रवी चौधरी  यांच्या पथकाने मध्यरात्री मुख्य संशयित मिलिंद आखाडे याच्या मुसक्या आवळल्या. 

Protected Content