मुंबई वृत्तसंस्था । भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एलआयसीने डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी एक घोषणा केली आहे. ती म्हणजे, क्रेडीट कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना सेवा शुक्ल माफ करण्यात येत आहे.
विमा उद्योगात सर्वाधिक वाटा असलेल्या ‘एलआयसी’ने डीजिटल व्यवहार वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार क्रेडीट कार्डने व्यवहार करणा-या ग्राहकाना पैसे भरताना आकारले जाणारे शुल्क (convenience fee) रद्द करण्यात आले आहे. यापुढे प्रिमियम , कर्जाचा हप्ता, व्याज आदी शुल्क क्रेडीट कार्डने अदा केल्यास ग्राहकाला सेवा शुल्कातून सूट मिळेल, असे ”एलआयसी”ने प्रसिध्दि पत्रकात म्हटले आहे. विमा बाजारपेठेत ”एलआयसी”चा तब्बल ७० टक्के हिस्सा आहे. त्यामुळे या शुल्क सवलतीचा हजारो विमा धारकांना फायदा होणार आहे.