पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकतास तालुका अमळनेर येथील रेल्वेत सेवानिवृत्त कै. मुरलीधर पाटील यांचे चिरंजीव व आधी सैन्यात सेवानिवृत्त होत महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत असलेले अरूण मुरलीधर पाटील यांनी नाशिक विभाग आयुक्त यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या महसूल क्रिडा स्पर्धा सह पथसंचालन व गोळा फेक यात भाग घेत सुवर्ण पदक मिळवले.त्यांनी केलेल्या या कार्याचा सन्मान झाला पाहिजे म्हणून महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी संघटनेच्या पारोळा येथील कार्यालयात सत्कार केला.
सुनील देवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,तलाठी अरूण पाटील यांच्या कडे तालुक्यातील इटनेर, धुळपिंप्री,वाघरा-वाघरी,हिरापुर या सजा असून एवढ्या सजांचे काम असून देखील ते शेतकऱ्यांना न्याय देत असतात हे विशेष आहे.त्यांनी फक्त त्यांचेच नाही तर त्यांच्या गावाचे,कुळाचे,कुटुंबाचे व शेवटी आपल्या पारोळा तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे म्हणून पुढे याही पेक्षा आपण मोठी भरारी घ्यावी असे सांगितले.सोबत जे चांगले काम करतात त्यांचा सत्कार करण्यात येतो आणि जे शेतकऱ्यांना त्रास देतात किंवा चुकीचे कृत्य करतात त्यांना घरी पाठविण्याचेही कार्य संघटना करत असते हे मागील काळात तालुक्याने पाहिले आहे कसे सांगितले.
या कार्यक्रमाला संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ विनोद चौधरी, पारोळा युवा शहर अध्यक्ष अनिल संजय पाटील,सदस्य निखिल राजेंद्र मराठे, नितेश राजेंद्र मराठे,तलाठी रोहित लक्ष्मण पवार,मोंढाळेचे सेवानिवृत्त पोस्टमन भाईदास सैदांणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विनोद चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल पाटील यांनी मांडले.