Home Cities अमळनेर महिलेच्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन मोबाईल लांबविले !

महिलेच्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन मोबाईल लांबविले !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन मोबाईल असा एकुण ३९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सिमाबाई संजय यादव वय ४२ रा. प्रोफसर कॉलनी, अमळनेर या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी ८ एप्रिल रोजी रात्री १० वाजता त्या जेवण करून आतून दार बंद करून घरात झोपलेल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे आतील कडी उघडून घरातून सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन मोबाइल असा एकुण ३९ हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार दुसऱ्या दिवशी मंगळवारी ९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक साळुंखे हे करीत आहे.


Protected Content

Play sound