Home Cities जळगाव सुभाष चौकातून महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोकड लांबविली

सुभाष चौकातून महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोकड लांबविली

0
37
chain snatching


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील सराफा बाजार ते सुभाष चौकात महिलेच्या पर्समधून ३८ हजार २०० किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, वंदना सुभाष ठाकूर (वय-४५) रा. साई पॅलेस हॉटेल मागे, वैष्णवी पार्क, जळगाव या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्या कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील सराफा बाजारात आल्या होत्या. काही वस्तू खरेदी केल्यानंतर सराफा बाजाराकडून सुभाष चौककडे येत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली सोन्याचे व चांदीचे दागिने आणि दोन हजार रुपयांची रोकड असा ३८ हजार २०० किंमतीचा ऐवज चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी महिलेने शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बोदवडे करीत आहे.


Protected Content

Play sound