चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | रस्त्याने पायी जाणाऱ्या एका विवाहितेच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवरील अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत तक्रार दाखल होताच शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चोरट्याला ताब्यात घेत ७० हजारांचा मद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त, शहरातील हनुमानवाडी येथील सुषमा प्रमोद पाटील (वय- ३५) हि विवाहिता १८ जून २०२२ रोजी रस्त्याने पायी जात होते. तेव्हा अचानक मागून आलेल्या दुचाकीवरील भामट्याने त्याच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात भादंवि कलम- ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यानुसार शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. व गुप्त माहितीनुसार सापळा रचून नामे शेख सालिमोद्दीन शेख अफल जोद्दीन (वय-५२) रा. कासंबरी दर्गा, पडेगाव जि. औरंगाबाद याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता गुरन २४९/२०२२ भादंवि कलम- ३९४ च्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यावर पोलिसांनी त्याच्याकडून ७० हजार रुपये किंमतीच्या सोन्याची पोत ताब्यात घेतली आहे. सदर कारवाई डॉ. प्रविण मुंढे, पोलीस अधिक्षक जळगांव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव, भरत काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगांव व के. के. पाटील पोलीस निरीक्षक, चाळीसगाव शहर पोलीस स्थानक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोउनि सुहास आव्हाड, पोना राहुल सोनवणे, पोकों निलेश पाटील, विजय पाटील, विनोद भोई, रविद्र बच्छे आदींनी केली आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि सुहास आव्हाड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अंमलदार करीत आहे.