Home Cities जळगाव सोने-चांदीच्या दरांमध्ये तेजी

सोने-चांदीच्या दरांमध्ये तेजी

0
28
1490265882 wgc gold demand report 2016 india gold demand world gold demand trends india gold jewellery

जळगाव प्रतिनिधी । आज सराफ बाजारात जोरदार तेजी पहायला मिळाली असून सोन्याने ३९ हजार रूपये प्रति-तोळा इतका टप्पा पार केला असून चांदीचे दरही वधारले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका आणि चीनमधील व्यापार युध्दाची तीव्रता वाढल्याने सराफ बाजारात तेजीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या दोन्ही देशांची सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केल्यामुळे याचे भाव ३९ हजार रूपये प्रति-तोळा या दराच्या पलीकडे गेले. तर चांदीच्या दरातही भाववाढ झाल्याचे दिसून आले आहे.

जळगावच्या स्थानिक बाजारपेठेत सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या दरांमध्ये वृध्दी झाल्याचे दिसून आले आहे. आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये दुपारी सोन्याचा प्रति-तोळा भाव ३९ हजार इतके होते. तर भंगाळे ज्वेलर्समध्ये प्रति-तोळा ३८,६०० रूपये तर चांदीचा भाव ४५ हजार रूपये प्रति-किलो इतका होता.

 

gold price jalgaon, gold price today jalgaon, gold rate today jalgaon, gold rate today in jalgaon, jalgaon gold market, jalgaon gold


Protected Content

Play sound