जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्ताने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक अतुल बर्हाटे यांनी गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांना थ्री.डी.आर्टचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.
पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनाच्या उद्देशाने गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या वस्तूंपासून नवीन वस्तू बनवून कलाकौशल्य दाखवले. स्वरचित कविता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून चित्र प्रदर्शन केले. इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने योगदान दिले. यावेळी भक्ती धारक, कैलास किनगे, नियंती पाटील यांनी पर्यावरणबाबत कविता सादर केल्यात. प्रास्ताविक आनम पटेल हिने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेन व चिन्मय यांनी तर आभार श्रेया पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ.नितीन भोळे यांच्यासह शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.