सडावन विकासोच्या चेअरमनपदी वसंत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी छायाबाई पाटील

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सडावन येथील विकासोच्या चेअरमन आणि व्हॉइस चेअरमनपदाची निवड नुकतीच संपन्न झाली.

तालुक्यातील सडावन येथील विकासोच्या चेअरमनपदी रढावन येथील वसंत आनंदा पाटील यांची तर व्हॉइस चेअरमनपदी सडावन च्या छायाबाई पुरुषोत्तम पाटील यांची निवड करण्यात आली. सडावन, रढावन, चाकवे, सुंदरपट्टी, हेडावे, राजोरे या सहा गावांची एकत्र मिळून ही सोसायटी असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.

निवडीवेळी संचालक भास्कर पाटील (सुंदरपट्टी), अशोक पोपट ब्रम्हे (हेडावे), भास्कर रामदास पाटील (हेडावे), गंगाराम व्यंकट पाटील ( सडावण बु.), राजीवकुमार रमेश पाटील (सडावण बु.), अशोक त्र्यंबक पाटील (सडावण बु.), रंगलाल बाबुलाल पाटील (चाकवे), हिरालाल यशवंत धनगर (सुंदरपट्टी), सुनिल विनायक पाटील (सडावण खु.), श्रीमती मालुबाई लहू पाटील (रढावण), मनिलाल धोंडू पाटील (राजोरे) हे उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जगताप यांनी काम पाहिले त्यांना सचिव विजय शेखनाथ पाटील, क्लार्क शामकांत हरी पाटील यांनी सहकार्य केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!