भाजपा-सेनेची युती दिल्ली ते गल्लीपर्यंत राहिली पाहिजे- जगन्नाथ बाविस्कर

chopda news

चोपडा ( प्रतिनिधी ) । सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना महायुतीच्या माध्यमातुन निवडणुक लढवित आहे. लोकसभा निवडणुकीत युती करण्यात येते. त्यानंतरच्या सर्व निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या भरवश्यावर युती न करता निवडणुका लढविण्यात येतात.

त्यातच सर्वात जास्त त्या त्या पक्षाचे व सामान्य कार्यकर्त्यांचे नुकसान होतांना दिसते. कारण लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे मोठमोठे बघूणे(भांडे) शिजवताना कार्यकर्त्यांना सर्रास लाकडे ( सरपण ) बनवून जाळण्यात येते. त्यातकाही जुने – नवे व निष्ठावान कार्यकर्त्यांचा कोळसा होतो तर काहींची राख होत असते याचा पक्षातील मोठमोठे व संधीसाधु नेत्यांवर काहिच परीणाम होत नाही. याउलट सक्रिय कार्यकर्त्यांचा विरोधात राजकीय षडयंत्र रचून त्यांचा पक्षीय खून करण्यात येतो, असे बरेच उदाहरणे सांगता येतील. पण वरीष्ठांचे याकडे पद्धतशीरपणे व अक्षम्य दुर्लक्ष असते पक्ष व कार्यकर्त्यात समन्वय न साधता तोंडावर गोड बोलणारे व स्वार्थासाठी मागेपुढे फिरणाऱ्यांना जास्त महत्व दिले जाते. यासाठी युतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षप्रमुख व नेत्यांकडे यापुढील सर्व निवडणुकीत युती टिकवण्यासाठीचा आग्रह धरला पाहिजे. कारण बऱ्याच ठिकणी “तिन तिघाडा – काम बिघाडा” अशी भुमिका घेण्यात येते प्रचाराची रणधुमाळी मध्यावधीवर आलेली असतांना अजुनही युतीत समन्वय नसल्याचे दिसुन येत आहे. याचा परीणाम निकालावर होणार आहे. युतीच्या उमेद्वारांनी लक्ष देणे गरजेचे आहे म्हणुनच “भाजपा-सेनेची युती दिल्ली ते गल्ली पर्यंत राहिली पाहिजे” अशी स्पष्टोक्ती सामा कार्यकर्ते व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष – जगन्नाथ टी बाविस्कर ( गोरगावले बु।। ) यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

Add Comment

Protected Content