जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स असोसिएशन च्या वतीने सदस्य डॉक्टरांकडून जळगावातील पांजरपोळ संस्थेने चालविलेल्या गो-तीर्थ येथे गो-मातेची सेवा करण्यात आली. अधिक मासाचे औचित्य साधून पवित्र अश्या गोमातांना लापशी खाऊ घालण्यात आली. याप्रसंगी गौ-सेवाव्रती ॲड. विजय काबरा यांनी गौसेवेचे कार्य कश्या पद्धतीने चालविले जाते याची माहिती सांगितली. तसेच उपस्थित डॉक्टरांना या उपक्रमात सामील होण्यासाठी प्रेरणा दिली.
या प्रसंगी गौसेवा प्रदान करण्यासाठी जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. धनराज जे. चौधरी, उपाध्यक्ष डॉ. वीरन खडके, सचिव डॉ. जितेंद्र विसपुते, जेष्ठ मार्गदर्शक डॉ. विवेक शिंदे, डॉ. गोरखनाना पाटील, डॉ. व्ही.के. सोमाणी, सदस्य डॉ. बी.डी. सुतार, डॉ. भरत पाटील, डॉ. सुनील कोतवाल, डॉ. राजेंद्र पी. पाटील, डॉ. सोपान पाटील, डॉ. अनंत पाटील, डॉ. संदिप सा. पाटील, डॉ. महेंद्र पाटील, डॉ. कुणाल नारखेडे, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. धनराज एस. चौधरी, डॉ. योगेश वंजारी, डॉ. उमेश चौधरी, डॉ. उमेश पाटील, डॉ. सुशील मंत्री, डॉ. सुवर्णकार, डॉ. मनोज वा. पाटील, डॉ. नितीन पाटील आदी डॉक्टरांची उपस्थिती होती. संकल्पना जेष्ठ सदस्य डॉ. गोरख नाना पाटील यांची होती.
यानंतर उपस्थित सर्व डॉक्टर्स तसेच तेथील सर्व गौसेवाव्रतींसाठी नाश्ता व चहाचे आयोजन प्रसिद्ध गुदरोग विशेषज्ञ तथा शल्यचिकित्सक डॉ. मनोज वामन पाटील यांचे तर्फे करण्यात आले.