रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा प्रमुख म्हणून दणदणीत काम करणारे भाजपचे नेते नंदकिशोर महाजन यांच्याकडे आता सहा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी टाकण्यात आले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या सहा विधानसभा प्रमुखपदी नंदकिशोर महाजन यांची निवड प्रदेश भाजपाने केली आहे. यापूर्वी त्यांनी रावेर लोकसभा प्रमुख म्हणून काम पाहिले होते, ज्यामध्ये त्यांच्या कुशल रणनीतीमुळे भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. त्यांच्या या यशस्वी नेतृत्वाची दखल घेत, भाजपा प्रदेश समितीने त्यांना आणखी एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
नंदकिशोर महाजन यांनी रावेर लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी अतिशय प्रभावी कामगिरी केली होती. त्यांच्या रणनीतीमुळे भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून दिला. महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये भाजपाला आलेल्या फटक्याच्या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभेत मिळालेला विजय विशेष महत्वाचा होता. या पार्श्वभूमिवर, नंदकिशोर महाजन यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करीत, प्रदेश भाजपाने त्यांना आता सहा विधानसभा प्रमुख म्हणून निवडले आहे.
या अनुषंगाने नंदकिशोर महाजन यांच्याकडे आता भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर आणि मलकापूर या सहा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आली आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपा संघटनाचे काम बळकट करण्याची आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रभावी रणनीती आखण्याची जबाबदारी महाजन यांच्यावर आहे. त्यांच्या नेतृत्वात, या मतदारसंघांमध्ये भाजपाच्या विजयाची शक्यता अधिक बळकट होईल, असा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास आहे.
नंदकिशोर महाजन यांच्या निवडीमुळे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या नेत्याचा आदर्श ठेवून, कार्यकर्त्यांनी अधिक मेहनत घेऊन पक्षाला बळकट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. महाजन यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचे धोरणात्मक विचार हे पक्षासाठी लाभदायक ठरणार आहेत.
भाजपाच्या प्रदेश नेत्यांनीही नंदकिशोर महाजन यांच्यावर विश्वास दाखवला असून, त्यांच्या नेतृत्वाखालील विधानसभा प्रमुखांची संघटना प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. नंदकिशोर महाजन यांनी यापूर्वीही पक्षासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांच्या या अनुभवाचा फायदा भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये होईल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे भाजपाच्या संघटनात्मक कार्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
दरम्यान, नंदकिशोर महाजन यांनी त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि ही जबाबदारी विश्वासाने पेलण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या यशाची अपेक्षा आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाने आणि रणनीतीने, भाजपाचा गड अधिक मजबूत होईल आणि पक्षाला मोठ्या विजयाकडे नेईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.