नवी दिल्ली प्रतिनिधी । मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आऊटलूक या वैश्विक संस्थेने आज अहवाल सादर केला असून आगामी तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) फक्त १९ टक्के कंपन्याच फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच नव्या नोकऱ्या निर्माण होण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर असल्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आऊटलूक या वैश्विक संस्थेने मंगळवारी अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर येत आहे. तसेच देशभरातील ५, १३१ कंपन्यांशी ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत आर्थिक स्थिती आणि नव्या नोकऱ्यांच्या शक्यतांबाबत चर्चा केली. त्यात अवघ्या १९ टक्के कंपन्यांनी मनुष्यबळ वाढवली जाऊ शकते असं सांगितलं. तर कर्मचारी संख्येत बदल होईल अशी अपेक्षा नाही, असं ५२ टक्के कंपन्यांनी स्पष्ट केलं. तर कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत काही सांगू शकत नाही, असं २८ टक्के कंपन्यांनी सांगितलं. पुढील तिमाहीत नव्या नोकऱ्या निर्माण करण्यात जपान पहिल्या, तैवान दुसऱ्या आणि अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असेल असा अंदाज आहे.