
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत सरकारच्या पसारा कायद्या अंतर्गत एस. एस. प्रा. लिमिटेड तर्फे कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक भरती अभियान राबविण्यात येत आहे. ही भरती नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. आज सोमवारी (६ ऑक्टोबर) रोजी प्रातिनिधिक स्वरूपात आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यात ३०० पदे भरण्यात येणार आहे अशी माहिती भरती अधिकारी गोरख जगताप यांनी दिली. ही भरती गुरुवार ९ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी १० उत्तीर्ण व वय कमीतकमी १९ वर्ष तर जास्तीत जास्त ४० वर्ष वय पूर्ण असणे आवश्यक आहे.
सुरक्षा रक्षक भरतीसाठी वजन ४८ किलो पेक्षा जास्त असावे. तसेच उंची १६८ सेमी असावी. भरती झालेल्या उमेदवरांना प्रॉव्हिडंट फंड, संपूर्ण परिवारासाठी मेडिकल सुविधा, ग्रॅज्युटी, पीएफ पेन्शन आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र गार्ड बोर्डच्या कमीत कमी वेतन नियमाप्रमाणे १५ हजार ते २३ हजार वेतन दिले जाणार आहे. उमेदवाराने भरतीला येतांना आधार कार्ड, १० वी, १२ वी किंवा पदवी पैकी एक शैक्षणिक प्रमाणपत्राची झेरॉक्स, पासपोर्ट साईजचे २ फोटो व भरती होणाऱ्या तरुणांकडून ५०० रुपये रजिस्ट्रेशन फी घेण्यात येणार आहे.
या भारती अंतर्गत काल रविवारी १४ जणांची तर आज सोमवारी १५ जणांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. सोमवारी आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारकचे वीरेंद्र भोईटे, आबा कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.



