कानसवाडे खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या: कोळी महासंघाची मागणी ! (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानसवाडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच युवराज कोळी या तरूणाचा २१ मार्च रोजी निर्घृण खून करण्यात आला होता. या खूनाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात यावी, या मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, युवराज कोळी यांचा २१ मार्च २०२५ रोजी कानसवाडे येथे भरदिवसा निर्घृण खून करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनी आरोपींची नावे सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली. या घटनेमुळे समाज बांधवांमध्ये तीव्र भावना आणि संताप व्यक्त होत आहे.

कोळी महासंघाच्या मागण्या:
या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवर एसआयटी स्थापन करून निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी. या खूनामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यालाही आरोपी करण्यात यावे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मयत युवराज सोपान कोळी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी. मयत हे आदिवासी जमातीचे असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.

या निवेदनावर संघटनेचे सुभाष कोळी, दीपक तायडे, नितीन सपकाळे, भरत पाटील, प्रल्हाद सोनवणे, किरण तायडे, प्रकाश बाविस्कर, रवींद्र कोळी, गजानन सोनवणे, योगेश साळुंखे, ऋषिदास सोनवणे, विशाल सपकाळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content