मुंबई प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावर एमआयएम अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर टीका करत ‘फक्त एकट्या सावरकरांसाठी का ? महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या, असा टोला लगावला आहे.
ओवेसी यांनी भाजपावर निशाणा साधताना म्हटलं आहे की, ‘फक्त एकट्या सावरकरांसाठी का? महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेसाठीदेखील भारताचा सर्वोत्कृष्ट सन्मान का मागत नाही. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘महात्मा गांधीच्या हत्येच्या कटात सहभागी व्यक्तीला भारतरत्न देण्यासंबंधी कसा काय विचार केला जाऊ शकतो. जर तुम्ही सावरकरांना देत असाल तर मग नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या’. असा टोला खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी लगावला आहे.