गिरीशभाऊ… नुसती घोषणाबाजी करून विकास कामे होत नाहीत : जयंत पाटील

8c1509e6 7f02 48e7 ba7f 888366a2aa56

जळगाव प्रतिनिधी । जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिका निवडणुकीच्या काळात १०० कोटी जळगाव पालिकेला देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापपर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे घोषणा करणाऱ्या सरकारचा कारभार पाच वर्षात नागरिकांनी बघितला आहे. गिरीशभाऊ…नुसती घोषणाबाजी करून विकास कामे होत नाहीत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ना. महाजन यांना लगावला आहे.

 

राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आज स्टार प्रचारक अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील,माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, जामनेरमध्ये भ्रष्टाचार किती झाला? याची माहिती घेणे गरजेचे आहे. याठिकाणी काम कमी तर जाहिरातबाजी जास्त झाली आहे. त्याच्याविरोधात भाजप पक्षाचे सहयोगी अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी जलयुक्त कामाची तक्रार केलेली आहे. जामनेरात सर्वाधिक पाणी टंचाई व कुपोषण बालक असल्याचे आढळून आहेत. त्यामुळे जलसंपदामंत्र्यांनी स्वतःच्या जामनेरकडे द्यावे, असा टोला देखील जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.

 

 

बहिणाबाई स्मारक, म्हसावद उड्डाणपुलाचे काम, साने गुरुजी स्मारक, क्रीडा संकुल या सगळ्यांच्या बाबतीत आज दुर्दैवाने या सरकारने काहीच केलेले नाही. महाजनांना बाकीच्या उद्योगांमुळे या कामांकडे दुर्लक्ष करावे लागले, असेल असे समजू शकतो. पण राज्याचे जलसंपदामंत्री असल्यामुळे त्याकडे त्यांनी लक्ष देणे गरजेचे होते,असेही श्री. पाटील म्हणाले. भुसावळात अलीकडे ५ जणांचा खून करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली एकंदरीत दिसून येत आहे. आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था ढासळलेली आहे.

 

 

जलसिंचन खाते असताना पाडळसे धरणाला पुरेसा निधी मिळालेला नाही. जलसंपदा विभागाने याकडे दुर्लक्ष केले.याच बरोबर विदर्भातील अडचणी दूर करता आल्या नाहीत. जलसिंचन विभागाने याबद्दल ताशेरे ओढले होते. पाडळसरे, नारपार प्रकल्प अद्याप पूर्ण करता आले नाहीत. आमच्या काळात मंजूर केलेली काम सत्ताधारी पाच वर्षानंतरही पूर्ण पूर्ण करू शकली नाहीत. मेगा रिचार्ज, कापूस, केळीचा प्रश्न, पिक विम्याचा प्रश्न पूर्ण केलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात शेतकर्‍यांना संपूर्ण कर्ज माफी, बेरोजगारी कमी करणार, सुशिक्षित बेरोजगारांना महागाई भत्ता पाच हजार रुपये देणार, या सारखे मुद्दे घेतले असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले. आमचे सरकार निवडून आल्यास या गोष्टींना प्राधान्य देणार आहोत. तसेच बचत गटाच्या महिलांना हाताला काम मिळेल व प्रत्येकी २ हजार रुपये मिळतील, या पद्धतीने काम करण्याचेही त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना राज्य सरकारांच्या कर्मचाऱ्याचा दर्जा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या वतीने आमचे सरकार आल्यानंतर त्यावेळी अर्थव्यवस्थेत कोलमडून पडले कामे देखील पूर्ण करणार आहोत,अशी ग्वाही देखील यावेळी जयंत पाटील यांनी दिली. इडीमध्ये शरद पवार यांचे जाणीपूर्वक नाव गोवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केला. मात्र, तरी देखील शरद पवार यांच्या उमेदवारांना महाराष्ट्रात प्रतिसाद मिळत आहे. एकंदरीत जनतेला महाआघाडीवर विश्वास आहे. त्यामुळे राज्यात आघाडीचे सरकार येणार आहे.

Protected Content