अखेर ‘त्या’ क्लीपवर गिरीशभाऊंनी सोडले मौन ! म्हणाले. . .

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा परिषद भरतीबाबत युवकाशी अरेरावीच्या भाषेत बोलण्याची ना. गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यावरून आता ना. महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लीप काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली. यात समोरचा युवक हा त्यांना जिल्हा परिषद भरतीबाबत विचारणा करत असतांना महाजन यांनी त्याला अरेरावीने उत्तर दिल्याचे दिसून आले आहे. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर सोशल आणि मेनस्ट्रीम मीडियातून प्रचंड खळबळ उडाली. ना. महाजन यांनी अशा प्रकारे असंवेदनशील प्रकारे बोलणे अयोग्य असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली.

या प्रकरणी ना. गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रियेचा आमच्या मंत्रालयाशी काहीही संबंध नाही. उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र काही जण आपल्याला मुद्दा टार्गेट करत असल्याचे प्रतिपादन ना. गिरीश महाजन यांनी केले आहे.

Protected Content