भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या स्पर्धकांची राज्यस्तरीय पातळीवर निवड

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवकसेवा संचालनालयाच्यावतीने युवा महोत्सव २०२०-२१ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे हेमंत माळी, योगेंद्र बिसेन, निर्मल राजपूत, रितीक पाटील, सूमित भोये, मंगेश चौधरी, अजय गोसावी व भोईज शेख जुबेर या स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आलेल्या होत्या. महाराष्ट्रातील ८ विभागातील आठ संघा समोर पुढील स्पर्धा होणार आहे त्यात जळगाव विभागाचा संघ म्हणून या स्पर्धकांना ३ जानेवारी रोजी मुंबईला संधी देण्यात येणार आहे.

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या कल्पकतेतून दारिद्र्य रेषे खालील विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना झाली आहे. अभ्यासाबरोबर सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकासाच्या दृष्टीने कला, नाट्य, नृत्य, गायन या गुणांना देखील प्रोत्साहन देण्यात येते. इतकेच नव्हे तर स्पर्धांचे व्यासपीठ देखील उपलब्ध करून देण्यात येते. यात सहभागी काही स्पर्धक हे अनुभूती स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. शाळेमध्ये दहावीचे शिक्षण घेऊन ते आता पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पडले आहेत. हे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणा सोबत आपल्या परिवाराला आर्थिक मदत ही करतात. त्यातील योगेंद्र बिसेन,सूमित भोये, अश्विन खैरे, रोहन चव्हाण, सनी नाथ हे अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल येथे दहाव्या इयत्तेत शिकत आहेत. हे सर्व विद्यार्थी भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशन संस्थेसाठी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत असतात.

३० डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवकसेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्या विद्यमाने युवा महोत्सव झाला. लोकनृत्य व लोकगीत या सांघिक त्याच प्रमाणे व वैयक्तिक स्वरूपाच्या या स्पर्धेसाठी विविध विभाग होते. त्यात एकपात्री, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, कथ्थक, बासरी वादन आणि वक्तृत्व अशा स्पर्धा घेण्यात आल्या. लोकनृत्य प्रकारातील स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे प्रतिनिधीत्व केले होते. राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी स्पर्धकांचा प्रोत्साहन देऊन अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी रुपाली वाघ यांनी समन्वय साधला तर त्यांना कला शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे व निलेश बारी यांनी सहकार्य केले.

Protected Content