जळगाव जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदाची सुत्रे गिरीश महाजनांकडे !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी ना. गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखालीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या जातील हे यातून स्पष्ट झाले आहे.

राज्यातील महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून धुसफुस सुरू असतांनाच भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाचे पालकमंत्री नसणाऱ्या दहा जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. या मंत्र्याकडे संबंधीत जिल्ह्यातील पक्षवाढीचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. यात जळगाव जिल्ह्याची सूत्रे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे.

लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका/नगरपंचायत तसेच जळगाव महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची जबाबदारी ही ना. गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आल्याचे यातून दिसून येत आहे.

Protected Content