जळगाव (प्रतिनिधी) चैत्र शुध्द नवमी म्हणजेच रामजन्मोत्सवानिमीत्त शहरातील श्रीराम मंदिरांमध्ये दर्शनासाठी जनसागर उसळला होता. चिमुकले राम मंदिर याठिकाणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज आरती केली. यावेळी आमदार राजूमामा भोळे,आमदार चंदूभाई पटेल हे उपस्थित होते.
रामजन्मोत्सवानिमीत्त आज दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभु श्रीरामचंद्रांच्या जयघोषात सर्व मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात रामजन्माचा सोहळा पार पडला. शेकडो भाविकांनी रामजन्माच्या सोहळ्याला उपस्थित राहून हा क्षण डोळ्यांत साठवला. यात महिला भाविकांचे प्रमाण लक्षणीय होते. पोलीस मुख्यालयात असलेल्या चिमुकले राम मंदिर संस्थान येथे सकाळी श्रीराम पादुकांची महापूजा करण्यात आली. यानंतर मंदिर भाविकांना दर्शनसाठी खुले ठेवण्यात आले होते. मंदिराबाहेर वाहनांची गर्दी असल्याने पोलीसांचाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी चांगलीच दमछाक झाली होती.