Home Cities जामनेर शिवसेनेची द्विधा मनस्थितीतून फजिती- आ. गिरीश महाजन

शिवसेनेची द्विधा मनस्थितीतून फजिती- आ. गिरीश महाजन

0
31

नाशिक– राममंदिर भूमीपूजन सोहळ्याबाबत शिवसेनेची द्विधा मनस्थितीतून फजिती झाल्याचे सांगत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी येथे जोरदार टीकास्त्र सोडले.

अयोध्येतील भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्त नाशकात महाजन यांच्या हस्ते काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाबाहेर प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, भूमिपुजनासाठीी अयोध्येला जायचे की नाही, याबाबत शिवसेना आणि उद्धव ठाकरे सदैव द्विधा मनस्थितीत होते. त्यामुळेच ई भूमीपूजन करा, असे त्यांनी सांगितले. पण जनभावना काय आहे, त्याचा विचार केला नाही. या संपूर्ण सोहळ्यात शिवसेनेची अवस्था ही धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी झाल्याचा टोला त्यांनी मारला. दोन्ही पक्षांना सांभाळायची कसरत करावी लागल्याने त्यांची त्यात चांगलीच फजिती झाली असल्याची टीका महाजन यांनी केली.


Protected Content

Play sound