Home Cities जामनेर ना. गिरीश महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क ( व्हिडीओ )

ना. गिरीश महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क ( व्हिडीओ )

0
66

girish mahajan voting

जामनेर प्रतिनिधी । येथील महायुतीचे उमेदवार ना. गिरीश महाजन यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

जामनेर मतदारसंघात महायुतीचे ना. गिरीश महाजन आणि महाआघाडीचे संजय गरूड यांच्यात लढत होत आहे. निवडणुकीच्या कालखंडात येथील सामना हा अतिशय चुरशीचा होण्याचे संकेत मिळाले आहेत. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी ना. गिरीश महाजन यांनी आपल्या सौभाग्यवती तथा जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन आणि आपल्या कन्येसह जामनेर येथे मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी मतदारसंघातील विविध केंद्रांना भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

पहा : मतदानाचा हक्क बजावतांना महाजन कुटुंबीय.


Protected Content

Play sound