जिल्ह्यात विधानसभेसाठी मतदानास प्रारंभ

Voting

जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांच्या उत्सुकतेच्या केंद्रबिंदू बनलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमध्ये मतदानास प्रारंभ झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारसंघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर पडद्याआडच्या घडामोडींना वेग आला होता. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी सात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात एकूण ३४ लाख ५३ हजार ०६२ एवढे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये १७ लाख ९९ हजार १४८ पुरुष तर १६ लाख ५३ हजार ८२४ महिला आणि ९० इतर मतदार आहेत.

या निवडणुकीत जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातून १०० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एम.आय.एम., मनसे यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये काही ठिकाणी अपक्षांनी मुख्य पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यातही मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण, चोपडा, जामनेर, रावेर या मतदार संघातील लढती अधिक लक्षवेधी आहेत. त्याचवेळी काही ठिकाणी एकतर्फी लढती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content