जळगाव प्रतिनिधी । डॉ. सतीश पाटील यांनी मतपत्रीकेवर निवडणूक घेण्याचे केलेले आव्हान पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी स्वीकारले आहे.
याबाबत वृत्त असे की, आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आज पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांना थेट आव्हान देत मतपत्रीकेच्या माध्यमातून निवडणूक घेण्याचे पत्रकारांशी बोलतांना चॅलेंज केले आहे. ते म्हणाले की, बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास मी पुन्हा वाढीव मताधिक्याने विजयी होणार आहे. त्यांनी याप्रसंगी ना. महाजन यांच्यावर जोरदार टीकादेखील केली होती.
दरम्यान, ना. गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाल्यानंतर या आव्हानाचा स्वीकार केला. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, डॉ. सतीश पाटील यांनी सर्व परवानग्या घेऊन याव्यात. आम्ही बॅलेट पेपरवर लढून जिंकून दाखवू. विरोधकांची गत ही नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली असल्याची टिकादेखील ना. महाजन यांनी केली.
पहा : ना. गिरीश महाजन हे डॉ. सतीश पाटलांच्या चॅलेंजवर नेमके काय म्हणालेत ते !