निवडणुकीत विरोधकांचा ढोल फुटणार- ना. गिरीश महाजन

girish mahajan with dhol

नाशिक प्रतिनिधी । विरोधी पक्षांचा ढोल या निवडणुकीत वाजणार नसून फुटणार असल्याचे वक्तव्य जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले आहे. ते गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पत्रकारांशी बोलत होते.

ना. गिरीश महाजन हे नेहमीच विविध मिरवणुकांमध्ये ढोलाच्या तालावर बहारदार नृत्य करतात. तर ते अतिशय उत्तम लेझीमदेखील खेळतात. या अनुषंगाने आज गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत नाशिक येथे त्यांनी स्वत: ढोल वाजवून उपस्थितांचा उत्साह वाढविला. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, मी स्वत: मंडळांमधून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. जामनेरला माझे स्वत:चे ढोल व लेझीम पथक आहे. मी अतिशय उत्तम लेझीम खेळतो. मी कुस्तीसह विविध खेळांमध्ये पारंगत आहे. अनेकदा इतरांना ढोल वाजवतांना पाहून मलादेखील वाजवावेसे वाटते असे ना. महाजन म्हणाले. यावर या निवडणुकीत विरोधकांचा ढोल वाजणार का ? असा प्रश्‍न विचारला असता ना. महाजन म्हणाले की, या निवडणुकीत विरोधकांचा ढोल वाजणार नसून फुटणार आहे. यामुळे अर्थातच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर पसरली.

Protected Content