पाचोरा प्रतिनिधी । सेहगल फाऊंडेशनर्फे येथील ग्रामीण रुग्णालयास आज (दि. २ जुलै) रोजी तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन भेट स्वरुपात देण्यात आले आहे.
याप्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष शरद पाटील, प्रविण ब्राम्हणे, आदर्श अॅग्रो एजन्सी, जळगांव चे प्रदिप पाटील, पाचोरा येथील संघवी कृषी सेवा केंद्राचे संचालक किशोर संघवी, औरंगाबाद येथील हायटेक झोनल मॅनेजर सुमित पाटील, रिजनल मॅनेजर चेतनसिंग गिरासे, हायटेक सीड्स पाचोरा प्रतिनिधी महेश पाटील, उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेहगल फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने संपूर्ण भारतात ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन (१० लिटर क्षमतेचे) वाटपाचा संकल्प हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात नंदुरबार, औरंगाबाद, जळगांव, यवतमाळ जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन देण्यात येत असतांनाच हायटेक सीड्सचे वितरक तथा जळगाव येथील आदर्श अॅग्रो एजन्सीचे संचालक राजु धनसिंग पाटील यांनी सेहगल फाऊंडेशनला विनंती करत पाचोरा ग्रामीण रुग्णालयास ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन द्याव्यात. याबाबत सेहगल फाऊंडेशनने आज पाचोरा ग्रामीण रुग्णालयास तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी सेहगल फाऊंडेशन, आदर्श अॅग्रो एजन्सीचे संचालक राजु धनसिंग पाटील तसेच संघवी कृषी सेवा, पाचोरा यांचे आभार व्यक्त केले.