पाचोरा न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण

 

पाचोरा, प्रतिनिधी  । पाचोरा दिवाणी न्यायालयाच्या आवारात आज वृक्षारोपण करण्यात आले

यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, दिवाणी न्यायाधीश एफ. के. सिद्दीकी, सह दिवाणी न्यायाधीश एल. ए. श्रीखंडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कामटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, अॅड. संजीव नैनाव, अॅड. अनुराग काटकर, अॅड. सुनिल पाटील, अॅड. डी. आर. पाटील, अॅड. अनिल पाटील, अॅड. रवि राजपुत, अॅड. रोहीत ब्राम्हणे, न्यायालयीन सहाय्यक अधीक्षक ए. आर. पाटील, सविता जाधव, न्यायालयीन पैरवी अधिकारी पो. काॅ. दिपक (आबा) पाटील, पो. हे. काॅ.  प्रदिप पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करुन लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी घेण्यात आला. यावेळी गुलाब, जास्वंदी, मोगरा, अशोक, लिंब यासारख्या वृक्षांची संपूर्ण आवारात लागवड करण्यात आली. वृक्षारोपण यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी डी. के. पाटील, रविंद्र पाटील, प्रशांत वंजारी, नितीन कदम, सचिन राजपुत यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content