ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरूणाचा दबुन मृत्यू

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारात मक्याचा चारा घेण्यासाठी जात असणाऱ्या ट्रॅक्टचा पाटच्या चारीच्या रस्त्यावरील खड्डे चूकवीत असताना ट्रॅक्टर ट्रालीसह पाटाचारीत कोसळल्याने योगेश ज्ञानेश्वर सैदाणे (वय-२०) रा. अंबे ता. शिरपूर हा ट्रॅक्टरच्या धुड खाली दाबला जाऊन जागीच ठार झाला. ही घटना ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १०.१५ वाजेच्या सुमारास नागदुली शिवारात निंबा पाटील यांच्या शेताजवळ घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालकसह ट्रालीमध्ये बसलेले दोन मजूर हे किरकोळ जखमी झाले.

मृत योगेश सैंदाणे हा नागदूली येथे मामाकडे राहत होता. तो मजूरीचे काम करीत होता. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रवींद्र अभिमान कोळी, योगेश ज्ञानेश्वर सैंदाणे, उदेस गोविंदा कोळी ,खूशाल राजू, रवींद्र अभिमान कोळी यांच्यासोबत योगेश सैंदाणे हा नागदूली शिवारातील शेतातील त्याच्या चारा भरण्यासाठी ट्रॅक्टर क्रमांक ( एमएच १९ डीव्ही २६७१) घरुन निघाले रवींद्र अभिमान कोळी हा ट्रॅक्टर चालवीत होता. सुकेश्वर मंदिराकडे जाणारा रस्त्यावर पाटाच्या चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी झाले. या घटनेचे वृत्त समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. योगेश सैंदाणे हा ट्रॅक्टरच्या मडगार्डवर बसला होता व ट्रॅक्टरचे धूड खाली दाबल्या गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले व खाजगी गाडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. ट्रॅक्टर चालक रवींद्र कोळी व ट्रॉली मधील उदेश कोळी, खुशाल माळी यांना किरकोळ मार लागल्या असल्याने त्यांना सुद्धा उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी दीपक शालिक कोळी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एरंडोल पोलीस करीत आहेत.

Protected Content